छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील शिवभोजन कार्यलयाचे उद्घाटन

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ठिकठिकाणी शिवभोजन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.

छगन भुजबळ (फोटो सौजन्य-Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवभोजन (Shiv Bhojan) योजनेला आजपासून सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ठिकठिकाणी शिवभोजन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यातच अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यात त्यांच्या हस्ते शिवभोजन कार्यलायचे उद्घाटन केल आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आहे. सत्तेत आल्यानंतर गोर गरिबांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळेल असे शिवसेना पक्षाने आपल्या वचननाम्यात म्हटले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर आजपासून (26 जानेवारी) या योजेनेला सुरवात झाली आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना 10 रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षाने जनतेला दिले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात या 10 रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. दरम्यान, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवभोजन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, शिवभोजन ही महाविकासआघाडीच्या समान किमान कार्यक्रमाची ही संयुक्त योजना आहे. शिवभोजन थाळीची घोषणा जरी शिवसेनेची असली तरी उल्लेख मात्र महाविकासआघाडीचा उपक्रम म्हणून येणार आहे. तसेच प्रत्येकाला वागण्याचे, बोलण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून यात वाढ होणार आहे. महिलांना आणि गरिबांना काम देणारा हा उपक्रम आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार निगराणी ठेवणार आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील; मात्र, ते निष्ठावंत असले पाहिजेत- नितीन गडकरी

या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागणारआहे. त्यासाठी शासनाकडून 'महा अन्नपूर्णा' हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान 75 आणि कमाल 150 जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी 12 ते 2 या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif