साखर कारखाना खरेदी पोलीस चौकशीत पवार कुटुंबियांच्या बारामती अॅग्रो लि. कंपनीचा समावेश
दोन दिवसांनंतर कन्नड एसएसकेएलच्या लिलावात भाग घेण्यासाठी हायटेकने 4.59 कोटी रुपये एमएससी बँकेकडे वर्ग केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MCC Bank) ने साखर कारखान्यांना मंजूर केलेले कर्ज आणि त्यानंतर आजारी असलेल्या साखर कारखान्यांच्या लिलाव प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या तपासात अनेक साखर कारखाना खरेदी व्यवहारांमध्ये अनियमितता आढळली आहे. या कारखान्यांमध्ये बारामती अॅग्रो लिमिटेड (Baramati Agro Ltd.) आणि अशाच एका साखर कारखान्याचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच, या कारखान्याची मालकी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे असल्याचे समजते.
दरम्यान, 2007 ते 2011 पर्यंत म्हणजे राज्य सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकेत विलिनीकरण होईपर्यंत अजित पवार हेच या बँकेचे संचालक होते. मंबई पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठेवलेल्या आरोपांमध्ये आणि ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या खटल्यामध्ये आरोपी म्हणून अजित पवार यांचे नाव असल्याचेही समजते. सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एमएससी बँकेचे कर्ज परतफेड न करु शकल्याने कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसकेएल) चा 2012 मध्ये लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बारामती अॅग्रो कंपनीने सर्वाधिक 50.20 कोटी रुपयांची बोली लावत हा कारखाना विकत घेतला. या कारखान्यासाठी लागेलल्या बोलीत हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि समृद्धी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनीही या लिलावात भाग घेतला होता.
नियमांनुसार या तिन्ही कंपन्यांना लिलावात भाग घेण्यासाठी प्रत्येकी 4.59 कोटी रुपयांची प्रामाणिक रक्कम जमा केली. दरम्यान पोलीस तपासात आता पुढे आले आहे की बारामती अॅग्रोने हायटेक इंजिनिअरिंगसाठीही मोठ्या पैशाची रक्कम जमा केल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी सांगितले की 25 ऑगस्ट २०१२ रोजी हायटेक अभियांत्रिकीला बारामती अॅग्रोकडून पाच कोटी रुपये मिळाले. दोन दिवसांनंतर कन्नड एसएसकेएलच्या लिलावात भाग घेण्यासाठी हायटेकने 4.59 कोटी रुपये एमएससी बँकेकडे वर्ग केले. (हेही वाचा, राजकीय मतभेद विसरून आमदार रोहित पवार यांनी केलं अमित ठाकरे यांचं मनसे नेतेपदाच्या जबाबदारीसाठी अभिनंदन; सोबत व्यक्त केला 'हा' आशावाद!)
बारामती एक्सपोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत कोणत्याही तपास यंत्रणेने आम्हाला याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. आमचा विश्वास आहे की आपल्या ईमेलमध्ये नमूद केलेली प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. शिवाय मुंबई उच्च न्यायालयासमोर या प्रकरणाची चौकशी होत आहे. त्यामुळे ही न्याप्रविष्ठ बाब असल्याने त्यावर बोलता येणारनाही. ”