गर्लफ्रेण्डच्या नादात संसार बर्बाद; बापाने चिरला 3 वर्षांच्या मुलीचा गळा, पत्नालाही मारले ठार
त्याने पोलिसांना सांगितले की, पत्नीनेच त्याच्या छोट्या मुलीची हत्या केली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने या दोन्ही हत्या आपणच केल्याची कबूली दिली.
मुंबईतील (Mumbai) माहीम पोलिसांनी(Mahim police) पत्नी आणि 3 वर्षांच्या चिमुलकीलच्या एका हत्या प्रकरणा प्रकरणात एक आठवड्यानंनतर आरोपी आणि त्याच्या साथिदारास महिलेस अटक केली आहे. इलियास सय्यद (Iliyas Sayyed) (वय 36 वर्षे) असे आरोपी तर, आफरीन बानो ( Aafreen Bano ) (वय 22 वर्षे) असे त्याच्या महिला साथीदाराचे नाव आहे. आफरीन ही इलियास याची प्रेयसी आहे. प्रेयसी आफरीन बानो हिच्यासोबत एकत्र रहायला मिळावे यासाठी इलियास याने स्वत:ची तीन वर्षांची मुलगी आणि पत्नीची गळा कापून हत्या केली. तीन वर्षांची मुलगी ही आपल्यासाठी कमनशीबी (Bad Luck) होती. तसेच, आफरीन हिच्यासोबत राहण्यास पत्नीचा अडथळा होता. त्यामुळे आपण त्यांची गळा चिरुन हत्या केल्याचे आरोपी इलियास याने पोलिसांना माहिती देताना सांगितले. दरम्यान गुन्हा घडल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी इलियास आणि त्यांची प्रेयसी आफरीन यांनी पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर त्यांच्या माहिम (पश्चिम) विभागातील डायमंड अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅटला आग लावण्याचाही प्रयत्न केला. फ्लॅटला लागलेल्या आगीमध्ये मृतदेह जळावेत असा आरोपींचा हेतू होता. मात्र, तो सफल झाला नाही. ही घटना 31 जानेवारीच्या सकाळी घडली. इलियास सय्यद राहात असलेल्या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील एका घरातून मोठ्या प्रमाणावर धूर येताना नागिरकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने फोन करुन या घटनेची माहिती पोलीस आणि इलियास याला दिली. त्यानंतर इलियास आणि पोलीस घटनास्थलावर पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून पाहिले असता, त्याची पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केल्याचे समोर आले. त्यांचे मृतदेह किचनमध्ये पडले होते. (हेही वाचा, विवाहित महिलेवर पोलिसाचा बलात्कार, चोरीच्या आरोपात धक्कादायक खुलासा)
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा इलियास याची मोठी मुलगी शाळेत होती. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी इलियास सय्यद आणि आफरीन बानो यांना ताब्यात घेतले होते. आफरीन ही एका खासगी कंपनीत सेल्सगर्ल म्हणून काम करते. इलियस सय्यद आणि आफरीन यांच्यात गेली तीन वर्षे विवाहबाह्य संबंध सुरु होते, असे पोलिसांनी सांगितले. चौकशी वेळी इलियास सय्यद याने पोलिसांना सांगितले की, माझी मुलगी माझ्यासाठी वाईट नशीब घेऊन आली होती. ती जन्माला आल्यापासून माझ्या आयुष्यात सर्व काही वाईट घडत गेले. त्यामुळेच मी तिला ठार मारले. मला आफरीन बानो हिच्यासोबत विवाह करायचा होता. मी आणि माझी मोठी मुलगी आणी बानो असे तीघे एकत्र राहण्याचा माझा विचार होता. सुरुवातीला इलियास याने पोलिसांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांना सांगितले की, पत्नीनेच त्याच्या छोट्या मुलीची हत्या केली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने या दोन्ही हत्या आपणच केल्याची कबूली दिली.