Mumbai: कांदिवली येथे दोन पुजाऱ्यांना जमावाकडून बेदम मारहाण, 2 जण पोलिसांच्या ताब्यात

दोन पुजाऱ्यांवर जमावाने हल्ला केला आहे. चाकू आणि काठ्याने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

Two priests were brutally beaten Photo Credit TWITTER

Mumbai: मुंबईतील कांदिवली (Kandivali) येथील लालजीपाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन पुजाऱ्यांवर जमावाने हल्ला केला आहे. चाकू आणि काठ्याने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. (हेही वाचा-  मद्यधुंद तरुणाची ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ, अंधेरी येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील लालजीपाडा रस्त्यावर दोन हिंदू पुजाऱ्यांना परिसरातील जमावाने बेदम मारहाण केली. पुजारी घरी परतत होते त्यावेळीस ही घटना घडली.  व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, जमाव पुजाऱ्यांचा पाठलाग करत आहे त्यांना अपमानित करून मारहाण करत आहे. एक व्यक्ती पुजाऱ्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. १८ ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुजाऱ्यांना जमावाने का मारले हे अद्याप समजू शकले नाही.

पाहा व्हिडिओ 

एकाने स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात ५ जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसा या प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणातून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.