Coronavirus Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Cases In Aurangabad: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतात थैमान घातलं आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 765 इतकी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 6497 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 408 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 860 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा - Coronavirus Cases In Pune: गेल्या 24 तासात पुण्यात 205 नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56,621 वर पोहोचली)

आज जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 56 तर ग्रामीण भागातील 36 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागांमध्येदेखील कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव वाढताना दिसत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभारत 246 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 वर पोहचली आहे. यातील 1 लाख 82 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय सध्या 1 लाख 32 हजार 236 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



संबंधित बातम्या