Aurangabad: औरंगाबादमध्ये ACP ने महिलेचा घरात घुसून केला विनयभंग, गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या जबाबाच्या आधारे एसीपी विशाल ढुमे यांच्याविरुद्ध नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Aurangabad: औरंगाबाद गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी (ACP) रविवारी एका महिलेचा विनयभंग (Molestation) केला. तसेच मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून तिचा पती आणि सासूलाही मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या जबाबाच्या आधारे एसीपी विशाल ढुमे यांच्याविरुद्ध नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, ती, तिचे पती आणि त्यांचे कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडले होते, तिथे एसीपी धुमे हे देखील त्यांच्या मित्रासोबत दुसऱ्या टेबलवर उपस्थित होते. त्यांनी महिलेच्या पतीला त्याला पोलीस आयुक्तालयात सोडण्याची विनंती केली आणि नंतर त्यांच्या गाडीत बसवून महिलेचा विनयभंग केला. (हेही वाचा - Aurangabad Fire: औरंगाबादमधील वाळूज परिसरातील चटाई कंपनीला भीषण आग; आग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु)

वाशरूमच्या बहाण्याने एसीपी या महिलेच्या घरी गेले. यानंतर त्यांनी एसीपीने वॉशरूम वापरण्याची विनंती केली आणि तेथे त्यांनी महिलेची छेड काढली. तक्रारीनुसार, एसीपीने महिलेच्या सासूला आणि पतीला मारहाण केली. त्यावेळी महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिस हेल्पलाइनची मदत घेतली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि ते एसीपीला तिथून घेऊन गेले.

रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात कलम 354, 354डी, 452, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.