IPL Auction 2025 Live

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना AIMIM पक्षाचा पाठिंबा; खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

गेली अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षासोबत राहिले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेनेही मग युतीच्या जागा वाटपात सिल्लोड हा मतदारसंघ आपल्याकडे घेत सत्तार यांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या या उमेदवारीवरुनच जाधव यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली होती.

Harshvardhan Jadhav, Imtiyaz Jaleel | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करुन चर्चेत आलेले कन्नड विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एआयएमआयएम पक्षाने आपला पाठींबा दिला आहे. एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी ही घोषणा केली. कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत विरुद्ध हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) अशी लढाई होईल असे चित्र होते. मात्र, आयत्या वेळी किशोर पवार यांनी उमेदवारी केल्याने इथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. किशोर पवार हे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई आहेत. तर, हर्षवर्धन जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. या जावयांना कुणाची फूस आहे. आणि कोणाची किती ताकद आहे हे प्रत्यक्ष निकाला दिवशीच समोर येणार आहे.

इम्तियाज जलील यांच्या एआयएमआयएम पक्षाचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा मिळाल्याने त्यांचे पारडे इथे जड झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव हे एकेकाळचे शिवसैनिक आहेत. मात्र, मधल्या काळात त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत स्वत:चा पक्ष काढला आहे. हर्षवर्धन जाधव हे अत्यंत वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका केली होती. ही टीका करताना त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली होती. (हेही वाचा, 'मुसलमानांचं इतकंच वावडं आहे तर मग सत्तार तुमच्या आईचा....!'; शिवसेना नेतृत्वावर टीका करताना हर्षवर्धन जाधव यांची जीभ कमालीची घसरली)

अब्दुल सत्तार हे काँग्रेस आमदार होते. गेली अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षासोबत राहिले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेनेही मग युतीच्या जागा वाटपात सिल्लोड हा मतदारसंघ आपल्याकडे घेत सत्तार यांना उमेदवारी दिली. त्या आधी सिल्लोड हा मतदारसंघ हा भाजपकडे होता. सत्तार यांच्या या उमेदवारीवरुनच जाधव यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली होती.