Mumbai Crime: ढोंगी बाबाने महिलेला जाळ्यात अडकवल, सलग पाच वर्ष केला लैंगिक छळ, आरोपी भाईंदर पोलिसांच्या ताब्यात
काळा जादूच्या नावाखाली फसवणूक केली. आणि पाच वर्ष महिलेचा छळ केला.
Mumbai Crime: भाईंदर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलां फसवणून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळा जादूच्या (Black magic) नावाखाली महिलांना हेरून त्यांच्यावर ढोंगी बाबा बलात्कार करतो. या ढोंगी बाबाला भाईंदर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. सलग पाच वर्ष महिलेचा छळ केल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या ढोंगी बाबावर बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात महिलांचा सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिला आहे.
एका पस्तीस वर्षांच्या महिलेला जाळ्यात अडकवत त्याने पीडित महिलेवर सलग पाच वर्ष बलात्कार केला. मुकेश दर्जी असं या आरोपीचं नाव आहे. महिलांना लुबडण्याचं काम त्याला चांगलच जमू लागल होत. एका मैत्रणीच्या सांगण्यावरून पीडित महिलेला जाळ्यात अडकवली. आपलं दु:ख, दारिद्र संपाव म्हणून काही उपाय करायचा अस म्हणात धर ती महिला या ढोंगी बाबाच्या आहारी गेली. उपाय म्हणून तीला जे सांगितलं ते ऐकून सर्वांचे होश उडाले आहे. उपाय म्हणून माझ्या समोर विवस्त्र व्हावे लागेल आणि माझ्याशी संबंध ठेवावे लागेल, जस तू संबंध ठेवशील तसं तुझ दु: ख कमी होईल. अश्या प्रकारे तीला जाळ्यात अडकवले.
हा भोंदू बाबा काळीजादू करताना लहान मुलीच्या पोटातील कुठल्यातरी अवयवापासून बनवलेला धूप वापरतो, असं महिलेनं सांगितलं. लिंबू विधी, महिलांशी संभोग विधी, जिनला बोलावण्याचा विधी असे प्रकार तो करत असल्याचंही महिला म्हणाली. धुपामध्ये एक कापूस आणि लाल डाग असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. या भोंदू बाबाच्या आहारी गेलेल्यांनी काळी जादू करण्यासाठी आपलं मंगळसूत्र आणि घर विकून पैसे काढल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.
अखेर त्या महिलेने आरोपी विरुध्द भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस कंबर कसून चौकशी करत आहे. आरोपीने अजून किती महिलांना जाळ्यात अडकवून ठेवलं आहे ? या प्रकरणात चौकशी चालू केली आहे.