Maharashtra: महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांचे महत्त्वपूर्ण विधान

महाराष्ट्रातील विविध महापालिकेत (Maharashtra) सत्ता परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) जोरदार तयारी करताना दिसत आहे.

Sanjay Raut (Photo Credit - PTI)

महाराष्ट्रातील विविध महापालिकेत (Maharashtra) सत्ता परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) जोरदार तयारी करताना दिसत आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे सूत्र ठरवले आहे. याच निवडणुकांसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र राहणार आहेत. तसेच काँग्रेस (Congress) पक्षालाही यात सामावून घ्यायचे आहे, त्या बद्दल चर्चा करू. महत्वाचे म्हणजे, ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

नुकताच संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात त्यांनी भाष्य केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. महत्वाचे म्हणजे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर, त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे. तसेच पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. एकत्र लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- नगरसेवकांना 1 मार्चपासून कोविड-19 लस मिळणार; महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर BMC चे 'हे' स्पष्टीकरण

दरम्यान, संजय राऊत यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी अयोध्येत गेले पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो. राज ठाकरे यांना अयोध्येत गेल्यानंतर शिवसेनेने केलेले कार्य दिसेल, असेही ते म्हणाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement