Heavy Rain in Maharashtra: महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
सुरुवातीला काही काळ हजेरी लावून गायब झालेला पाऊस पुन्हा परतला आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Forecast Maharashtra: महाराष्ट्रात राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी (Heavy Rain in Maharashtra) लावली आहे. सुरुवातीला काही काळ हजेरी लावून गायब झालेला पाऊस पुन्हा परतला आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसात पढणाऱ्या मुसळधार पावसाची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही (Eknath Shinde) प्रशासनाला सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के एस होसाळीकर यांनी त्यांच्या खासगी ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे 5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची अधिक शक्यता आहे. मुंबई, ठाणे परिसरातही अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात आज सायंकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी, नाशिक (Nashik) या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शिवाय कोकण (Kokan), पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (हेही वाचा, Pune Rain Update: गणेशोत्सवादरम्यान पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज)
मुंबई, ठाण्यात मुसळधार
मुंबई आणि ठाणे परिसरात आज सांयकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. मात्र, त्याची तीव्रता वाढून तो मूसळधार झाला. परिणामी ठाणे शहरांतील रस्त्यांवर पाणी साचले. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र, वातावरणातील काळोख आणि वातावरणातील दमटता कायम आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पावसाला पूरक वातावरण निर्माण होत आहे. परिणामी मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम, मध्य महाराष्ट्रासह उर्वरीत महाराष्ट्रातही हलका, मध्यम आणि मुसळधार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. इतरही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरपाचा पाऊस कोसळतो आहे.