महाराष्ट्रातील हवामान: राज्यात परतीचा पाऊस? कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अधिक जोर, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी

काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे.

महाराष्ट्रातील हवामान: राज्यात परतीचा पाऊस?  कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अधिक जोर, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी
Rain Update| X

राज्यातील हवामान (Maharashtra Weather Forecast) कमालीचे बदलत असून, पाठिमागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy in Maharashtra ) बरसत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रदीर्घ काळ विश्रांती घेऊन पुन्हा सक्रीय झालेला हा परतीचा पाऊस तर नव्हे ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, परतीच्या पावसाबाबत आयएमडीने अद्याप तरी भाष्य केले नाही.

उद्याचे हवामान आणि पाऊस

पर्जन्यमान यंदा समाधानकारक म्हणावे असे आहे. राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे. अर्थात, त्यातही काही कमी अधिक प्रमाण आहे. मात्र, असे असले तरी अगदीच नाही असेही चित्र नाही. त्यामुळे बळीराजा आणि पशुपालन करणाऱ्या नागरिकांसाठी ती एक सुखकारक बाब आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा सीलसीला कायम राहणार असल्याची शक्यता गृहीत धरुन हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.खास करुन रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी हा अलर्ट असून, या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान अंदाज व्यक्त करताना वर्तविण्यात आली आहे. (हेही वाचा, Weather Forecast Maharashtra: मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या, पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज)

राज्यातील जिल्ह्यांना आज (बुधवार) कोणता अलर्ट

पाऊस केव्हा उघडणार?

दरम्यान, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातही काही ठिकाणी साधारण तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकते, असा आयएमडीचा अंदाज आहे. सातारा, पुणे (काही भाग), नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव आदी जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुढच्या तीन चार दिवसांनंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागेल. ज्यामुळे उष्णता वाढेल आणि नागरिकांना ऑक्टोबर हिट जाणवण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. खास करुन मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर येत्या शुक्रवारपासूनकमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Pune Dam Storage Update: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराजवळील धरणे भरली, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज, नागरिकांना नदीपात्र न उतरण्याचा सल्ला)

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पाठिमागच्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मेघगर्जना ऐकायला मिळत आहे. सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह विचांचाही कडकडाट पाहायला मिळतो आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif