मुंबईत पुन्हा वाढणार 'ऑक्टोबर हीट' : मुंबई वेधशाळेचा अंदाज

सायक्लोनमुळे थंडावलेल्या वातावरणानंतर पुन्हा मुंबई तापणार असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवळा आहे.

मुंबई ऑक्टोबर हीट Photo credits : Pixabay

ऑक्टोबर हीटला मुंबईत सुरूवात झाली आहे. मागील आठड्यात मुंबईकर उन्हाच्या चटक्याने होरपळले होते. कमाल 37 डिग्री सेल्सियसवर गेलेला पार मागील काही काही दिवसात खालावला आहे. मात्र पुन्हा मुंबईकरांना कडक उन्हाच्या झळांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अनुमानानुसार, मुंबईत पुन्हा ऑक्टोबर हीटचा पारा चढणार आहे. सध्या सायक्लोनच्या तडाख्यामुळे मुंबईतील वातावरण थोडं खालावले आहे. मागील आठवड्यात 37 वर पोहचलेला तापमानाचा पारा सध्या 34 डिग्री सेल्सियसवर आला आहे. मात्र भविष्यात तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

वातावरण सतत होणार्‍या या बदलांमुळे अनेक मुंबईकर सर्दी, खोकला आणि तापाने बेजार झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात वाढणारं आजारपण आटोक्यात ठेवायचं असेल तर संतुलित आहाराचा समावेश करा. उन्हात बाहेर पडताना पुरेशी काळजी घ्या. सर्दी तापाची लक्षण सौम्य असतानाच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.