Maharashtra Rain Update: आज मुंबई कोकणसह इतर भागात पावसाची स्थिती काय असणार? जाणून घ्या

आता पर्यंत अतिवृष्टीमुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज हवामान कसा असेल जाणून घ्या

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Rain Update: जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसाने थैमान घातले होते.  राज्यातील काही ठिकाणी अद्यापही चांगला पाऊस नाही, काही ठिकाणी कमी स्वरुपाचा पाऊस आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. कोकणात देखील सखल भागात पाणी साचले होते. राज्याच्या काही ठिकाणी शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहतोय. एकीकडे संपुर्ण शेत पाण्या खाली आले आहे.  मुंबई, ठाणे पालघर, या ठिकाणी पावसाने चांगलेच झोपडपले आहे. तर कालच्या दुपारपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे असे म्हणावे लागेल.

त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांच्या चिंता वाढल्या आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, ठाणे, पालघर आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश आहे. याशिवाय पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांगाला मुसळधार पाऊस असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात. शहराला पाणीपुरवठा करणारे सातही धरण पूर्णपणे भरले. (हेही वाचा-  आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने मुंबईसह गावातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.)

आजही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता मुंबईकर मुसळधार पाऊस कधी विश्रांती घेतो याकडे लक्ष देत आहे. राज्यात मराठवाड्यातील काही भागात हिंगोली आणि इतर भागात काल मेघगर्जनेसह पाऊस होता. सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif