IIT-Mumbai Convocation Event in Virtual Reality: आयआयटी मुंबई दीक्षांत समारंभ साजरा झाला 'Virtual Reality' पद्धतीने, पाहा Video
राज्यातील कोरोना व्हायरस स्थिती आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशा पद्धतीने दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव विचारात घेता सोशल डिस्टन्सींग (Social Distance) कटाक्षाने पाळले जात आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतने राज्यातील अनेक शाळा, महाविद्यालयंही बंद आहेत. अगदी सार्वजनिक सण उत्सव सुद्धा. असे असतानाही आयआयटी मुंबई दीक्षांत समारंभ (IIT Mumbai Convocation Ceremony 2020) पार पडला. होय, आणि तोही अगदी अनोख्या पद्धतीने. यंदाचा आयआयटी मुंबई (IIT Mumbai) दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony 2020) व्हर्च्युअल (Virtual Reality) पद्धतीने पार पडला आहे. या समारंभाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आयआयटी मुंबईने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला. राज्यातील कोरोना व्हायरस स्थिती आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशा पद्धतीने दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. (हेही वाचा, 'राष्ट्रविरोधी, समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका' आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना इशारा)
आयआयटी मुंबई दीक्षांत समारंभ 2020 (व्हिडिओ)
संचालक प्राध्यापक सुभाषीश चौधरी यांच्यासह अनेक पदवीधारक विद्यार्थ्यांनी पदवीच्या पोशाखात पदवी घेतली आणि मान्यवरांनीही तशा पोशाखातच पदवीदान (दीक्षा) केले. हा कार्यक्रम पूर्णपणे व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला.