IIT Student Suicide: आयआयटी चेन्नई येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या; आई-वडील मित्रांच्या नावे सुसाईड नोट
स्टीव्हन सनी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. आयआयटी (IIT Madras) वसतिगृहाच्या खोलीत ही घटना शुक्रवारी (21 एप्रिल) आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा विद्यार्थी मुळचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे.
चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Chennai ) विद्यार्थ्याचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थत आढळून आला. स्टीव्हन सनी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. आयआयटी (IIT Madras) वसतिगृहाच्या खोलीत ही घटना शुक्रवारी (21 एप्रिल) आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा विद्यार्थी मुळचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. तो आयआयटी चेन्नईमध्ये बीटेकच्या द्वितीय वर्षाचे (B Tech Student) शिक्षण घेत होता. आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे.
आयआयटी चेन्नईने वारंवार सांगितले आहे की ते विद्यार्थी/विद्वान, प्राध्यापक आणि कॅम्पसमधील कर्मचारी यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच विविध प्रणालींचे सतत मूल्यांकन करत आहेत. परंतु, संस्थेच्या म्हणण्यानुसार, कोविड नंतरचे वातावरण "आव्हानात्मक" आहे. विद्यार्थी, संस्था आणि परिस्थीती हे गणित बदलून गेले आहे.
या वर्षात आयआयटी चेन्नईच्या कँम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यानंतर IIT मद्रासने अशा घटनांचा शोध घेण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींसह एक स्थायी संस्था अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली. पण त्यानंतर लगेचच आणखी दोन संशयित आत्महत्येची नोंद झाली. त्यामुळे या आत्महत्या रोखायच्या कशा याबाबत प्रशासनामसो आव्हान आहे. (हेही वाचा, IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!)
दरम्यान, फेब्रुवारी या महिन्या या वर्षीची (2023) IIT मद्रासमध्ये पहिली विद्यार्थ्याची आत्महत्येची घटना नोंदवली गेली. या घटनेत 24 वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. लगेच पुढच्या महिन्यात 14 मार्च रोजी शेजारच्या आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेला 20 वर्षीय विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याचे नाव श्रीसाई. तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचा बीटेक तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. तर 31 मार्च रोजी आयआयटी मद्रासमधील पीएचडी करणाऱ्या 32 वर्षीय विद्यार्थ्यानेही त्याच्या खोलीत आत्महत्या केली होती. तो पश्चिम बंगालचा होता.सचिन कुमार जैन असे त्याचे नाव होते.