IIT-Bombay चे डिसेंबर 2020 पर्यंतचे वर्ग ऑनलाईन होणार; COVID 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय
IIT Bombay च्या 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा नव्या अॅकॅडमी वर्षात विद्यार्थ्यांच्या शिवाय शिक्षणाला सुरूवात होणार आहे.
इंडियन इंस्टिट्युट टेक्नॉलॉजी ऑफ बॉम्बे कडून वर्ष अखेरी पर्यंत विद्यार्थ्यांची ऑन कॅम्पस लेक्चर रद्द केली आहे. दरम्यान हा निर्णय सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीवर आधारित घेण्यात आला आहे. IIT Bombay च्या 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा नव्या अॅकॅडमी वर्षात विद्यार्थ्यांच्या शिवाय शिक्षणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान मुंबई पाठोपाठ देशभरात इतर आयआयटी इंस्टिट्युट देखील असाच निर्णय घेतील अशी दाट शक्यता आहे. साधारणपणे जुलै ते डिसेंबर असा एका सेमिस्टरचा काळ असतो.
टाईम्स ऑफ ईंडियाच्या माहितीनुसार, IIT-Bombay चे संचालक सुभाषिष चौधरी (Subhasis Chaudhuri)यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कोविड 19 ने आपल्याला यंदा शिक्षण नव्याने कसं सुरू करता येऊ शकतं याबद्दल विचार करायला शिकवलं. प्रदीर्घ चर्चेनंतर आता पुढील संपूर्ण सेमिस्टर ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय झाला आहे. याबाबत त्यांनी एक फेसबूक पोस्ट देखील केली आहे.
IIT-Bombay चे संचालक सुभाषिष चौधरी यांची फेसबूक पोस्ट
दरम्यान अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचा कोर्स जुलै महिन्यात सुरू होणार आहे. चैधरी यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी समाजाने पुढे येऊन आर्थिक सहाय्य देखील करावं असं आवाहन केले आहे. अनेक गरीब मुलांना लॅपटॉप, ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी यांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा खर्च सुमारे 5 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.