Death Threat To Yogi Adityanath: '10 दिवसांत राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दीकीसारखे हाल होतील'; योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Death Threat To Yogi Adityanath (फोटो सौजन्य - फेसबुक, File Image)

Death Threat To Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षात धमकीचा संदेश देण्यात आला आहे. एका अनोळखी क्रमांकावरून मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाला फोन करून एका व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांची अवस्था बाबा सिद्दीकींसारखी होईल, अशी धमकी दिली आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अनेक राऊंड फायर केले होते, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरही धमक्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. (हेही वाचा - Salman Khan Death Threat: '2 कोटी द्या, नाहीतर मारून टाकू'; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी)

झीशान सिद्दीकी आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकी -

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, झीशान सिद्दीकी यांना धमकीचा फोन आला होता. त्यानंतर काही दिवसातचं अभिनेता सलमान खान यालादेखील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने जीवे मारण्याची धमकी दिली होती. (हेही वाचा -Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज)

पप्पू यादवला जीवे मारण्याची धमकी -

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार पप्पू यादव यांनाही सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबाबत पप्पू यादवने पोलिसांपासून गृहमंत्रालयापर्यंत तक्रार केली आहे. पप्पू यादवला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif