सावधान! WhatsApp किंवा सोशल मीडियाद्वारे पॉर्न व्हिडीओ पाठवत असाल तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा

कारण चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

जर तुम्ही नियमित पॉर्न पाहत असाल आणि त्याचे जर तुम्हाला व्यसन लागले असेल तर त्या आधी तुम्ही चाईल्ड पोर्नोग्राफी (Pornography) तर पाहत नाही ना याची काळजी घ्या. कारण चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार,  तुम्ही जर चाईल्ड पॉर्न व्हिडीओ (Child Porn Video) किंवा त्यासंबंधित कोणताही कन्टेन्ट किंवा फोटो कोणाला पाठवत असाल तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. नुकत्याच एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुर, महाराष्ट्रातातील बीड जिल्ह्यामधील दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात राहणाऱ्या या दोघांनी पॉर्न व्हिडिओ डाउनलोड (Porn Video Download) करून सोशल मीडियावर शेअर केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांना कळलं. परंतु हे व्यक्ती नेमके कोण होते याचा अद्यापही पोलीस तपास घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अज्ञात व्यक्तींवर बीड जिल्ह्यातील परळी आणि गेवराई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्राईम फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटिड चिल्ड्रन (NCMEC) या संस्थेकडे त्याबद्दल कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. या संस्थेच्या नियमांनुसार, जे चाईल्ड पॉर्न शोधून, डाऊनलोड करुन इतरांना शेअर करतात अशा लोकांवर सायबर सेल मार्फत लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही एजन्सी देशभर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम आहे.

पॉर्न बघण्याचे व्यसन लागले तर होऊ शकतात अनेक त्रास; जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती

या आधी असाच एक गुन्हा उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता. किशन सिंह असे त्या व्यक्तीचे नाव असून इंटरनेटवर चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करुन फेसबुक, व्हाट्सअँपसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे मित्रांना पाठवत होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif