Quarantine चा शिक्का असतानाही घराबाहेर फिरणा-यांना पोलिसांच्या ताब्यात द्या- जयंत पाटील
परदेशातून आलेल्या ज्या लोकांच्या हातावर Quarantine चा शिक्का आहे आणि तरीही ते निर्धास्तपणे बाहेर फिरताना दिसत असतील तर अशा लोकांना ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात द्या असे आवहान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला सरकारकडून नागरिकांना देण्यात येत आहे. घरात राहणे हाच या आजारावर योग्य उपाय असल्याचेही शासनाकडून सांगण्यात येत आहे. असे असतानाही काही बेजबाबदार लोक निर्धास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यात परदेशातून आलेल्या ज्या लोकांच्या हातावर Quarantine चा शिक्का आहे आणि तरीही ते निर्धास्तपणे बाहेर फिरताना दिसत असतील तर अशा लोकांना ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात द्या असे आवहान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अनेक Quarantine घराबाहेर रस्त्यावर निर्धास्तपणे फिरताना दिसत आहे. यामुळे अशा बेजबाबदार लोक दिसल्यास त्यांना त्वरित पोलिसांच्या ताब्यात असे जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हमध्ये जनतेला आवाहन केले आहे. Quarantine म्हणजे नेमके काय? कसा झाला हा शब्द प्रचलित, जाणून घ्या सविस्तर
काही लोकांना पुढारपण करण्याची सवय असते. त्यांनी पुढारपण करू नये. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू वाटपाच्या बहाण्याने काही लोक ग्रुप करून बाहेर पडत आहेत. त्यांनीही ग्रुपद्वारे फिरू नये. तुमच्या ग्रुपमधील एखाद्यालाही करोनाची बाधा झालेली असू शकते. याचं भाग ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं. इतकंच नव्हे तर अन्य देशांचा आदर्श घ्या आणि घराबाहेर जाणे टाळा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करुन नका हे तुमच्या भल्याचे नाही असे सांगत Quarantine लोक दिसल्यास ताबडतोब प्रशासनाला त्याची माहिती द्या. त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.