Supriya Sule On Baba Siddique Murder: जर सरकारला माहित होते की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्याची सुरक्षा का वाढवण्यात आली नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीवर गोळी लागल्याने त्याला त्वरीत लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे.

Supriya Sule (फोटो सौजन्य - ANI)

Supriya Sule On Baba Siddique Murder: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीवर गोळी लागल्याने त्याला त्वरीत लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारला सवाल केला आहे.

यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'राज्यात ना महिला किंवा मुले सुरक्षित आहेत. हिट अँड रन, बलात्कार आणि खूनाच्या घटना वाढत आहेत. यामध्ये कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे आम्हाला सरकार बदलण्याची गरज आहे. सरकारने यामागील सूत्रधाराला पकडले पाहिजे. जर सरकारला माहित होते की, त्यांना (बाबा सिद्दीकी) यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यांची सुरक्षा का वाढवली नाही? अला संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला केला आहे. (हेही वाचा -Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा)

सोशल मीडियावरील पोस्टनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दिकीचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. या टोळीने म्हटले आहे की, अंडरवर्ल्डचा हस्तक दाऊद इब्राहिमशी असलेल्या कथित संबंधांमुळे त्यांनी वांद्र्याच्या माजी आमदाराला लक्ष्य केले. सिद्दीक त्याच्या वाहनात जात असताना हल्लेखोरांनी जवळपासच्या फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत गोळीबार केला. (हेही वाचा - Baba Siddique Last Rites: भर पावसात बाबा सिद्दिकींना अखेरचा निरोप, मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार)

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला सवाल, पहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे - 

एएनआय या वृत्तसंस्थेने मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान झीशान आणि बाबा सिद्दीकी हे दोघेही त्यांचे लक्ष्य असल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांना कोणाचाही सामना करावा लागला तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.