सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यास शिवसेना भाजप पक्षासोबत युती तोडण्याची शक्यता
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमधील वाद लवकरच आटोपता न घेतल्यास शिवसेना महायुतीपासून वेगळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) पक्षात मुख्यमंत्री (CM) पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमधील वाद लवकरच आटोपता न घेतल्यास शिवसेना महायुतीपासून वेगळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी शिवसेनेची भुमिका काय असणार हे फार महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत सेनाभवनात उद्धव ठाकरे यांची सुद्धा एक बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी असे म्हटले की, आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असायला पाहिजे. मात्र आम्ही आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत. तो पर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार रंगशादरा हॉटेलमध्येच थांबणार आहेत. तर 5 वाजता उद्धव ठाकरे आमदारांना भेटण्यासाठी जाणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेने स्पष्ट केले आहे की, भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये पोहचले होते. 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे. तत्पूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.(महाराष्ट्रात सत्तास्थापनापूर्वी आजचा दिवस महत्वाचा, भाजप-शिवसेना यांच्यामधील वाद बाजूला पण राज्यपालांकडे लक्ष)
भाजप-शिवसेना पक्षातील वाद मिटवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले की, आमचे शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरुन कोणतेही बोलणे झाले नव्हते. अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देणे याचे सुद्धा आश्वासन दिले नव्हते. मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेने सकारात्मक विचार करुन महाराष्ट्रातील जनतेच्या हिता नुसार निर्णय घ्यायला हवा. त्याचसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर आरएसएस किंवा मोहन भागवत यांची कोणतीच भुमिका नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.