Chandrakant Patil On Mahavikas Aghadi: शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे, पण महाविकास आघाडी सरकारचं मला माहीत नाही - चंद्रकांत पाटील
शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली की नाही हे मला माहीत नाही. परंतु, अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Chandrakant Patil On Mahavikas Aghadi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. मात्र, सरकारचं मला माहीत नाही, असं खोचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाच वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. यावेळी चंद्रकांत पाटील या प्रश्नाला उत्तर म्हणाले, 'सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीचं असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेळी तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं. सध्या शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. मात्र, सरकारचं मला माहीत नाही,' अशा खोचक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
यावेळी भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असादेखील प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना केला. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा पहाटेच्या शपथविधीसारखं नंतर समजेल. (वाचा - Sanjay Raut on Sharad Pawar, Amit Shah Meeting: शरद पवार - अमित शहा भेटले असतील तर त्यात गैर काय? संजय राऊत यांचा सवाल)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली की नाही हे मला माहीत नाही. परंतु, अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती, तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे मला माहीत नाही. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होत असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि लॉकडाऊनवर भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. मात्र, त्यावर लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. आम्ही लॉकडाऊनला विरोध करू, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)