Ajit Pawar: मी राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही म्हणून मी ‘तो’ निर्णय घेवू शकत नाही, अजित पवारांचं पुण्यात वक्तव्य

तसेच संबंधीत काही बाबींसाठी अजित पवार पुढील दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.

Ajit Pawar (Photo Credit - Twitter)

पुण्यातील (Pune) विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान पालकमंत्री म्हणून किंवा इतरही पदावर असलो तरी मी दरवर्षी पुण्याच्या गणपती विसर्जनास उपस्थित असतो असं विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तसेच यावर्षी विना निर्बंध गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडत असल्याने अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) असताना मात्र कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करता आला नाही याबाबत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. दरम्यान बाप्पाकडे काय मागण केलं असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले प्रत्येक वेळी बाप्पाला साकड घालून अडचणीत घालायचं नसतं तर भक्ती भावाने मी  दर्शन घेतलं आहे.

 

दरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही राजकीय बाबींवर देखील टिपण्णी केली. राष्ट्रवादी (NCP) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले मी काही राष्ट्रीय नेता नाही हा निर्णय घेणारा पार्टी हा निर्णय घेईल. तसेच संबंधीत काही बाबींसाठी अजित पवार (Ajit Pawar) पुढील दोन दिवस दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असणार आहे अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. (हे ही वाचा:- Agricultural Compensation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर शासन निर्णय काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींच्या मदतीचं वितरण)

 

तसेच लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभुमिवर भाजप (BJP) बारामतीसाठी (Baramati) विशेष रणनीती आखत असल्या बाबत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले बारामतीत माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.