Ajit Pawar Vs Sudhir Mungantiwar: 'तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा' सभागृहातच अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिले चॅलेंज

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून यावेळी शाब्दिक युद्धही रंगत आहे.

Ajit Pawar, Sudhir Mungantiwar (Photo Credit: Facebook)

Maharashtra Assembly Winter Session 2020: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून यावेळी शाब्दिक युद्धही रंगत आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठोकली. त्यानंतर मुनगंटीवारांचे चॅलेंज थेट अजित पवार यांनी स्वीकारले. तसेच मला पाडून दाखवा, असे खुले आवताणच अजित पवार यांनी दिले.

सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवार सरकारवर आरोप करत असताना अजित पवार त्यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. यावर अजित पवारांनीही तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केले. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा न झाल्याने विधानपरिषदेत भाजपा आमदारांचा सभात्याग; कामकाज तहकूब

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

तसेच, तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. असे माझ्या वाचनात आले आहे. अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझा जन्म जुलै महिन्यातला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली, असा चिमटा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी काढला आहे.