Bhima Koregaon, Maratha Morcha : गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील; देवेंद्र फडणवीस
पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले
Bhima Koregaon, Maratha Morcha : 1 जानेवारीला घडलेल्या भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. शौर्यदिनानिमित्त जमलेल्या आंबेडकरांच्या अनुयायांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी मोठा हिंसाचार उफाळला. या हिंसाचाराचा फटका पोलिसांनाही बसला होता. यात 60 पोलीस आणि 58 नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर 17 अॅट्रोसिटी आणि 1000 हून अधिक इतर गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांप्रकरणी 1199 आरोपींना अटक करण्यात आली होती, आणि 2 हजार 53 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा निमित्तदेखील छोटेमोठे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले. (हेही वाचा : मुंबई परिसरातील तीन नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा)
मराठा क्रांती मोर्चा तसेच भीमा कोरेगाव हिंसाचार यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग होता. या दोन्ही घटनांमध्ये निष्कारण तरुणांना गोवण्यात आले. यामुळेच त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात होती. याच कारणाने हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत आता मुख्यमंत्र्यांनी विचार करून हे गुन्हे मागे घेतले आहेत.
या संदर्भातली संपूर्ण आकडेवारीच आज जाहीर करण्यात आली.
मराठा मोर्चा दरम्यानचे गुन्हे -
एकूण गुन्हे दाखल – 543
गंभीर गुन्हे जे मागे घेता येणार नाहीत – 46
गुन्हे जे अंतिम प्रकारात मोडतात – 66
आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – 117
चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – 314
Status of cases during Bhima Koregaon agitation:
भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे -
एकूण दाखल गुन्हे – 655
गंभीर गुन्हे जे मागे घेता येणार नाहीत – 63
गुन्हे जे अंतिम प्रकारात मोडतात – 159
आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – 275
चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – 158