Hukka Parlor CCTV Footage: नवी मुंबईमध्ये हुक्का पार्लरमध्ये तरुणांमध्ये जोदार राडा, बेदम मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील कामोठे परिसरातील एका हुक्का पार्लरच्या टेरेसवर जोरदार राडा झाला. हुक्का पार्लरमध्ये (Hukka Parlor Cctv Footage) अचानक आलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जोरदार हल्ला केला. या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.

Hukka Parlor CCTV Footage: नवी मुंबईमध्ये हुक्का पार्लरमध्ये तरुणांमध्ये जोदार राडा, बेदम मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
Hukka Parlor CCTV Footage | (Photo Credit - Twitter)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील कामोठे परिसरातील एका हुक्का पार्लरच्या टेरेसवर जोरदार राडा झाला. हुक्का पार्लरमध्ये (Hukka Parlor Cctv Footage) अचानक आलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जोरदार हल्ला केला. या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते. या घटनेत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्यावर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चार मे राजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झाली आहे.

पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिताने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रांसह हुक्का पार्लरमध्ये बसला होता. या वेळी साधारण वीस ते पंचवीस तरुणांचे एक टोळके तेथे आले आणि त्यांनी फिर्यादीचे नाव विचारले. यात मुख्य आरोपी आघाडीवर होता. मुख्य आरोपीने फिर्यादीचे नाव विचारत तो बसलेल्या टाबलजवळ प्रवेश केला आणि अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादीला बेदम मारहाण केली. टेबल, खुर्ची आणि इतर वस्तूही फेकून मारल्या. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीला रुग्णालयात दाखल केले.

ट्विट

दरम्यान, फिर्यादीच्या मित्राने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि घडला प्रकार कथन केला. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन फिर्यादीचा जबाब घेतला आणि 20 ते 25 जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाख केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना पूर्ववैमनस्यातून घटली असावी असा अंदाज आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नवी मुंबईमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांना वरदहस्त कोणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).