HSC Exam 2019: 21 फेब्रुवारीपासून सुरू होतेय बारावीची परीक्षा, कॉपी बहाद्दरांसाठी यंदा MSBSHE चा नवा कडक नियम!

विद्यार्थ्यांना 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

MSBSHSE Class 12 Exam 2019:  मुंबई, कोकण, पुणे, नागपूर अशा महाराष्ट्रभारातील विविध शिक्षण विभागांमध्ये उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारी 2019 पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. बारावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा आणि परिक्षेच्या काळात नेमक्या कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं? यंदापासून कोणते नवे नियम असतील याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडून यंदा कॉपीचे प्रकार आटोक्यात ठेवण्यासाठी यंत्रणा अधिक सुसज्ज ठेवली जाईल याबाबत माहिती दिली जाईल. PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या दरम्यान कोणत्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचे आहे?

सकाळी 11 ते 2 आणि 3 ते 6 या दोन टप्प्यांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. 30-40 हजार तज्ञ आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीच्या  कामामध्ये मदत करणार आहेत.