महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यामातून केली आकडेवारी जाहीर
यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत, याची आकडेवारी जाहीर केली आहे
महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत, याची आकडेवारी जाहीर केली आहे. यात पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यात आढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. कोरना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत एकूण 6 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजार लोक बाधित झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे. सध्या भारतात एकूण 114 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, केवळ महाराष्ट्रात एकूण 39 रुग्ण आढळले आहेत. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
ककोरोना व्हायरस संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या मृतांच्या आकडेवारीत घट झाल्याचे समजत आहे. यामुळे कोरोना व्हायरचे प्रमाण लवकरच कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, इटली कोरोना व्हायरसशी झुंज देत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर इराण, अमेरीका, भारतासह अनेक देशांत कोरोना व्हायरचे रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे. यातच राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोरोनासंबंधित माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड- 9, पुणे- 7, मुंबई- 6, नागपूर- 4, यवतमाळ- 3, कल्याण- 3, नवी मुंबई- 3, राजगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: 'कोरोना व्हायरस'च्या भीतीने श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद; वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरु राहणार
ट्वीट-
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमागृहे, बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर मशिदी, चर्चसह धार्मिक स्थळेही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका निवडणूका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोनही निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्या याबाबत अशा सूचना विद्यापीठ मंडळाला देण्यात आल्या आहेत.