Pooja Chavan Suicide Case: सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदनाचा अहवाल आला समोर

पुजाने रविवारी रात्री पुण्याच्या वानवडी भागातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील सोशल मिडिया स्टार 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या आत्महत्यानंतर एकच खळबळ माजली होती. पुजाने रविवारी रात्री पुण्याच्या वानवडी भागातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर या आत्महत्येसंबंधी एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने पेट चांगलाच पेट घेतला आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमागे काही राजकीय नेत्यांचा संबंध असल्याची दावा करत याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यातच पूजा हिचा शवविच्छेनाचा अहवाल समोर आला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

पूजा हिच्या आत्महत्येनंतर तर्क वितर्क लावले जात आहेत. ती मद्य पिऊन बाल्कनीत बसली असताना पाय घसरुन तिचा मृत्यू झाला आहे, असे काहीजण बोलत आहेत. तर, अनेकांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. यातच पूजा हिचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, पूजाच्या डक्याला आणि मनक्याला जखम झाल्याची माहिती मिळत आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मनक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा अपघात होता की आत्महत्या की आणखी काही? याबाबत अधिक तपास केला जात आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र

पूजाच्या आत्महत्येनंतर अख्खे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपनंतर भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून तिच्या आत्महत्येमागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.