महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी आहेत हे चार पर्याय, ज्यावर होऊ शकतो गांभीर्याने विचार

त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू होणार हे जवळपास नक्की झाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule in Maharashtra) लागणे टाळायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांचा विचार करता ते पुढील प्रमाणे.

President's Rule in Maharashtra | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्याती सत्तासंघर्षानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी निर्माण झालेला घटनात्मक पेच. राज्यावर घोंगावत असलेले राष्ट्रपती राजवटीचे वादळ यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सरकार स्थापनेसाठी अयशस्वी ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षही त्याच वाटेवर आहे. त्यात राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू हेण्याबाबत अहवाल पाठवल्याचेही वृत्त आले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू होणार हे जवळपास नक्की झाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule in Maharashtra) लागणे टाळायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांचा विचार करता ते पुढील प्रमाणे.

शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार

मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटप या मुद्द्यांवरुन शिवसेना-भाजप यांच्या युतीत जनादेश मिळूनही खेळखंडोबा झाला. आता झालं गेलं विसरुन जात सत्तावाटपाची समाधानकारक बोलणी करुन शिवसेना भाजपला पुन्हा एकदा सत्तासोपान चढता येऊ शकतो. शिवसेनेकडे 54 तर भाजपकडे 105 आमदारांचे संख्याबळ आहे. पण, आता या दोन्ही पक्षांमधील हे मतभेद इतके टोकाला गेले आहेत की आता ते एकत्र येणे बरेचसे कठीण आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले तरीही बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो. हे समिकरण अस्वित्वात येता येता थांबले आहे. राज्यापालांनी बहूमत सिद्ध करण्यास अपेक्षीत वेळ वाढवून न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंबा पत्र मिळू शकले नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. हा वेळ वाढवून मिळावा यासाठी शिवसेा आता न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र, हा वेळ वाढवून मिळाल्यास पुन्हा एकदा हे समिकरण अस्तित्वात येऊ शकते. राष्ट्रपती राजवट टाळण्याचा हाही एक प्रभावी मार्ग आहे.

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस

खरे तर असं समिकरण मांडणे हे राजकीयदृष्ट्या राजकीयदृष्ट्या एक विनोदच. परंतू, राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे भाजप (105), राष्ट्रवादी काँग्रेस (54) आणि काँग्रेस (44) हे समिकरण असस्तित्वात आले तरीही 145 हा बहुमताच आकडा पार होऊ शकतो. असे घडले तरीही राष्ट्रपती राजवट टळू शकते.

फोडाफोडीचे राजकारण

दरम्यान, राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी आणखीही एक पर्याय आहे. तो म्हणजे ज्या पक्षाला सरकार स्थापन करायचे त्या पक्षाने इतर कुटल्याही पक्षातील बहुमतासाठी आवश्यक असे आमदार किंवा आमदारांचा गट फोडून हाताशी घ्यायचा. हे करताना पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही हे पाहावे लागेल. मात्र, हा पर्याय जनतेला आवडेलच असे नाही. हा पर्याय वापरल्याने प्रचंड टीकाही सहन करावी लागेल.