MHADA Houses to Police: बीडीडी चाळितील पोलिसांना 50 लाख रुपयांत घरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
ही घरे पोलिसांना 50 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वटरद्वारे ही माहिती दिली आहे.
मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत (BDD Chawl) म्हाडाद्वारे पोलिसांना घरे (MHADA Houses to Police) देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. ही घरे पोलिसांना 50 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वटरद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेनंतर शिवसेना आणि मुंबई पोलिसांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे वृत्त आहे. मात्र, ही नाराजी नेमकी कोणत्या स्वरुपाची आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे 1 कोटी 5 लाख ते 1 कोटी 15 लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या 2250 पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत ही विनंती'. (हेही वाचा, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार- जितेंद्र आव्हाड)
बीडीडीमध्ये जे पोलीस 50 ते 60 वर्षांपासून राहतात. आज त्या ठिकाणी घरं बांधायची किंवा घ्यायची म्हटले तर त्याची किंमत पडते 1.5 कोटी. त्यामुळे रक्कम मोठी आहे. त्यांना तेवढी झेपणार नाही. त्यामुळे त्यांना 50 लाख रुपयांमध्ये घरे देण्यात येणार आहेत. गेली अनेक वर्षे हे लोक तिथे राहात असल्याने त्यांना तसेच बाहेर काढणे योग्य राहणार नाही. त्यामुळे 50 लाख रुपयांमध्ये पोलिसांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांची एकूण प्रतिक्रिया पाहता