Probationary IAS Officer Puja Khedkar Case: घर, कार, स्वतंत्र कार्यालय...; प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या व्हॉट्सॲप चॅटद्वारे केलेल्या मागण्या उघड

पुण्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अधिकाऱ्याने या मागण्या केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या असामान्य मागण्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यांच्या अहवालात त्यांनी खेडकर यांचे प्रशिक्षण पुण्यात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे सुचवले आणि त्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असे नमूद केले.

Probationary IAS Officer Puja Khedkar (PC - X/@Normal_2610)

Probationary IAS Officer Puja Khedkar Case: महाराष्ट्र परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Trainee IAS officer Pooja Khedkar) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पूजा खेडकर यांनी केलेल्या मागण्यांचे व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) समोर आले आहे. यात पूजा यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वत:साठी स्वतंत्र कार्यालय, एक कार आणि घराची मागणी केली होती. पुण्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अधिकाऱ्याने या मागण्या केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या असामान्य मागण्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यांच्या अहवालात त्यांनी खेडकर यांचे प्रशिक्षण पुण्यात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे सुचवले आणि त्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असे नमूद केले.

पूजा खेडकर यांना स्वतःची चेंबर ऑफर करण्यात आली. तथापि, संलग्न बाथरूम नसल्यामुळे तिने येथील कार्यालय नाकारले, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. रुजू होण्यापूर्वी, खेडकर यांनी तिचे वडील दिलीप खेडकर यांच्यासमवेत कार्यालयाला भेट दिली आणि त्यांनी मिळून खाण खात्याच्या शेजारी असलेल्या व्हीआयपी हॉलचा केबिन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला. (हेही वाचा -Pune IAS Officer Pooja Khedkar Transfer: पुण्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदली; श्रीमंतीत जगण्याचा नाद पडला भारी)

प्रोबेशनरी ऑफिसरला सांगण्यात आले की, त्यांना प्रोबेशनवर या सुविधांचा अधिकार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर, 2023 बॅचच्या IAS अधिकारी खेडकर यांची प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर तेथे 30 जुलै 2025 पर्यंत 'सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर' म्हणून काम करणार आहे. तिने लाल-निळ्या रंगाचा दिवा आणि VIP नंबर प्लेट असलेली तिची खाजगी ऑडी कार देखील वापरली होती. तसेच त्यांच्या खाजगी कारवर 'महाराष्ट्र शासन' बोर्ड देखील लावला होता.

पहा व्हिडिओ -

दरम्यान, वादानंतर, पूजा यांच्या नियुक्तीच्या कागदपत्रांच्या छाननीत असे दिसून आले की. त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रे सादर केली. खेडकर यांनी ओबीसी आणि दृष्टिहीन प्रवर्गांतर्गत नागरी सेवा परीक्षा दिली. तिने मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केले. एप्रिल 2022 मध्ये, तिला तिच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यासाठी एम्समध्ये वैद्यकीय चाचण्या घेण्यास सांगण्यात आले. तथापि, खेडकर यांनी सहा वेगवेगळ्या प्रसंगी या परीक्षांना उपस्थित राहण्यास नकार दिला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now