कोरेगाव भीमा प्रकरणातील 348 गुन्हे मागे; गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधमंडळात माहिती

ते मागे घेतले जाणार नाहीत असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

Maharashtra Budget session 2020: कोरेगाव भीमा (Koregaon Bhima Case) प्रकरणात दाखल असलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 348 गुन्हे मागे घेण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधमंडळ सभागृहात दिली. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget session 2020) सुरु आहे. अधिवेशनादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख बोलत होते. दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येत असले तरी, गंभीर स्वरुपाचे गुन्हे कायम ठेवण्यात येणार आहेत. ते मागे घेतले जाणार नाहीत असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

सभागृहात माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणात विविध स्वरुपाचे एकूण 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु आहे. मात्र, याती काही गुन्हे पोलिसांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचवणे तसेच जाळपोळ करणे अशा गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे गुन्हे मागे घेण्यात येत असले तरी, गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असा पुनरुच्चारही गृहमंत्री देशमुख यांनी या वेळी केला. (हेही वाचा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार? पाहा काय म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार)

एएनआय ट्विट

राज्यात देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकार सत्तेत असताना भिमा कोरेगाव प्रकरण घडले होते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दंगल आणि हिंसाचार घडला होता. या प्रकणाचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केला होता. पुढच्या काळात या प्रकरणाची चौकशीही त्याच दिशेने झाले. महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक ठिकाणांहून नक्षलवादी चळवळीचा अभ्यास करणारे, तसेच डाव्या विचारांच्या अनेक नेते कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, त्याबाबतचा खटलाही न्यायालयात प्रलंबीत आहे.