Hingoli Accident: हिंगोलीत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जण जखमी

बस व ट्रकची समोरासमोर झालेल्या धडकेत बसमधील 15 प्रवासी जखमी झाले

Accident (PC - File Photo)

हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Accident) नांदेड जिंतूर महामार्गावरील वगरवाडी गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Bus and Truck Crash) झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे.या अपघातामध्ये बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी तीन जण गंभीर आहेत. बसवर ट्रक आदळल्याने हा भीषण अपघात झाला. जखमींना तात्काळ औंढा नागनाथ येथील शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने सध्या बचावकार्य सुरु आहे. नांदेड जिंतूर महामार्गावरील हा अपघात एवढा भीषण होता की, बसवर ट्रक आदळल्यामुळे बस पूर्णपणे क्रॉस झाली. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.  (हेही वाचा -Mumbai: भाईंदरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने आई आणि मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू)

स्थानिक लोकांनी जखमींना तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी रस्त्याने जाणारे खासदार हेमंत पाटील यांनी बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यास मदत केली. अपघातानंतर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला काढून वाहतूक पूर्ववत केली. आता ही वाहने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली आहे.



संबंधित बातम्या