Mumbai: भाईंदरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने आई आणि मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाचे प्रमुख राम चौहान शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या गावी परतले असता त्यांना त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी घराची खिडकी उघडली आणि खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले.

Mumbai: भाईंदरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने आई आणि मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai: भाईंदरमधील (Mira-Bhayandar) मुर्धा गावातील सदनिकेत 27 वर्षीय महिला, तिचा 8 वर्षांचा मुलगा आणि कुटुंबातील तीन सदस्यांसह रहस्यमय परिस्थितीत बेशुद्धावस्थेत आढळून आले. रोहित चौहान (वय, 8) हा जागीच मृतावस्थेत आढळला, तर त्याची आई कविता (वय 27) हिने जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे 4 वाजता अखेरचा श्वास घेतला.

कविता यांचा दिर श्याम चौहान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाचे प्रमुख राम चौहान शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या गावी परतले असता त्यांना त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी घराची खिडकी उघडली आणि खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. (हेही वाचा -सुट्टी न मिळाल्याचा राग अनावर; 23 वर्षीय मुलीने सुपरमार्केट कर्मचारीने लावली दुकानाला आग)

प्रथमदर्शनी घटनेपूर्वी कुटुंबीयांनी रात्रीचे जेवण केल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं म्हटलं जात आहे. तथापि, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि श्याम शुद्धीवर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल आणि घटनेचा क्रम स्थापित करण्यासाठी त्याचे म्हणणे मांडले जाईल.

मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर (पश्चिम) येथील पंडित भीमसेन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत. सध्या भाईंदर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2023 09:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).