Hinganghat Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात, काय होतं नेमकं प्रकरण?

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे कोर्टात हजर झाले असून ते पीडितेची बाजू मांडणार आहेत.

Burn Out | Representational Image (Photo Credits: Pixabay)

माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजातील विक्षिप्त लोकांचा चेहरा समोर आणणारी एक धक्कादायक घटना हिंगणघाट (Hinganghat) येथे घडली होती. जेथे एकतर्फी प्रेमातून आरोपीने प्राध्यापिकेला रस्त्यात जिवंत जाळले होते. ही घटना 3 फेब्रुवारी 2020 मध्ये घडली होती. हिंगणघाटच्या नंदोरी चौकात (Nandori Chowk) घडलेल्या या जळीत कांडाच्या प्रकरणाला आजपासून कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे कोर्टात हजर झाले असून ते पीडितेची बाजू मांडणार आहेत.

हिंगणघाट येथे प्राध्यापिका असलेली पीडितेवर आरोपी विकेश नगराळे याचे एकतर्फी प्रेम होते. या एकतर्फी प्रेमातूनच हे मोठे जळीतकांड घडले. ज्यात या आरोपीने त्या तरुणीस भर चौकात जिवंत जाळले. यात ती तरुणी 40% भाजली होती. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.हेदेखील वाचा- वर्धा: शिक्षिकेला जिंवत जाळणाऱ्या आरोपीला फाशी द्या, सर्वपक्षीयांकडून 'हिंगणघाट बंद'ची हाक

नेमकं काय घडलं होते 3 फेब्रुवारीला?

1. 3 फेब्रुवारीला सकाळी 7.15 वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकातून ही तरुणी जात असता आरोपी विकेश अचानक तिच्यासमोर आला आणि आपल्या हातातील पेट्रोलची बाटली तिच्या अंगावर टाकली आणि टेंभ्याने तिला आग लावून पेटवून दिले. यानंतर तेथील नागरिकांनी तिची आग विझवून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यात ती 40% भाजली होती. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी पीडित तरुणीच्या पालकांनी त्याला समज दिली होती. पीडितेला पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 9 फेब्रुवारीला या तरुणीचे उपचारादरम्यान निधन झाले.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची राज्य सरकारची घोषणा होताच प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे आता सर्व या घटनेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे.