भाज्यांच्या किंमती कडाडल्या, फळभाज्यांसह पालेभाज्याही महागल्या
यात मेथीची जुडी 20 ते 25 रुपयांपर्यंत झाली आहे.
उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना भाज्यांच्या किंमतीत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात दुष्काळ याचा परिणाम भाज्यांच्या किंमतीवर झाला आहे. यात फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या (Leafy vegetables) दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. यात मेथीची जुडी 20 ते 25 रुपयांपर्यंत झाली आहे. तर फ्लॉवर आणि कोबीच्या गड्ड्याची किंमत 20 रुपये इतकी झाली आहे. भाज्यांच्या हा वाढता आकडा लक्षात घेता ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे.
याआधीच तूरडाळी आणि अन्य डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ आता भाज्याही महागल्याने महिन्याचे बजेट कोलमडणार असून ह्या महागाईच्या चटका ग्राहकांना चांगलाच बसणार आहे हे एकूणच परिस्थितीवरुन दिसतय. चला तर पाहूया भाज्यांचे सध्याचे नवीन दर:
पालेभाज्या:(जुडी)
- मेथी- 20 ते 25 रुपये
- कांदा पात- 10 रुपये
- कोथिंबीर- 20 ते 30 रुपये
- पालक- 10 रुपये
- शेपू- 15 ते 20 रुपये
- करडा- 15 ते 20 रुपये
फळभाज्या:
- वांगी : 15 ते 20 रुपये
- टोमॅटो : 40 रुपये
- भेंडी : 20 ते 40 रुपये
- गवार : 60 ते 80 रुपये
- हिरवी मिरची : 40 ते 50 रुपये
- फ्लॉवर : 20 ते 40 रुपये
- कोबी : 20 ते 30 रुपये
- बटाटा : 25 ते 30 रुपये
- दोडका : 40 रुपये
- कारली : 60 रुपये
- लसूण : 60 ते 100 रुपये
- कांदा : 15 ते 25 रुपये
महागाईचा भडका उडणार, तूरडाळ 100 रुपये किलो
पालेभाज्या आणि फळभाज्याच्या किंमतीतील वाढ लक्षात घेता सामान्य माणूस या महागाईने पुरता होरपळून निघणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. येत्या काही दिवसात भाजीमंडईत महागाईची कोणती नवीन समस्या डोकं वर काढेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.