Coronavirus: महाराष्ट्रात 31 ते 40 वयोगटातील लोकांना COVID-19 ची सर्वाधिक लागण, पाहा वैद्यकिय विभागाचा रिपोर्ट

महाराष्ट्राच्या वैद्यकिय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 10 वर्षांच्या खालील मुले आणि 90 वर्षांपुढील वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचे सर्वात कमी आहे.

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढत जाणारी संख्या ही खूपच धक्कादायक असून आतापर्यंत राज्यात एकूण 88,528 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या कोरोना रुग्णांच्या संख्यात सर्वाधिक कोरोनाची लागण होणारे रुग्ण हे 31 ते 40 वयोगटातील असल्याचे वैद्यकिय विभागाच्या अहवालात समोर आले आहे. वैद्यकिय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने (Medical Education & Drugs Department) ही आकडेवारी सांगितली आहेत. ज्यात ज्येष्ठ नागरिकांपेक्षा 31 ते 40 वयोगटातील लोकांना कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या वैद्यकिय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 10 वर्षांच्या खालील मुले आणि 90 वर्षांपुढील वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचे सर्वात कमी आहे. Coronavirus In India: देशातील कोणत्या राज्यात किती कोरोनाबाधित? पहा महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात सह सर्व राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

पाहूया वयोगटानुसार कोविड-19 रुग्णांची टक्केवारीनुसार आकडेवारी

क्रमांक वयोगट % नुसार एकूण प्रमाण
1 10 वर्षांपर्यंत 3.3
2 11-20 वर्षे 6.45
3 21-30 वर्षे 19.27
4 31-40 वर्षे 20.24
5 41-50 वर्षे 18.04
6 51-60 वर्षे 16.97
7 61-70 वर्षे 10.08
8 71-80 वर्षे 4.24
9 81-90 वर्षे 1.26
10 91-100 वर्षे 0.15
11 101-110 वर्षे 0

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल

(8 जून) 2 हजार 553 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3,169 रुग्ण दगावले असून 40,975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणूला महाराष्ट्रातून पळून लावण्यासाठी राज्य सरकारसह सर्व कोविड योद्धा अथक परिश्रम घेत आहेत.

मागील 24 तासात 9987 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,66,598 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 331 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 7466 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात एकूण 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,29,215 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) सांगण्यात आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 2,553 रुग्णांची भर पडली आहे.