Ajit Pawar यांनी का सोडली होती Sharad Pawar यांची साथ? वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली.
Ajit Pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली. हे सर्व पाहून महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच एक आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची साथ तर दिलीच परंतु त्याचसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा देखील केला. आणि या 2-3 दिवसांच्या नाट्यानंतर आज मात्र अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत संपूर्ण राज्याला पुन्हा एक नवा धक्का दिला.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडण्यामागे नक्की काय कारण?
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार असा सवाल जेव्हा समोर आला तेव्हा दोन पर्याय समोर होते, ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार. पण शरद पवारांनी मात्र सुप्रिया यांना दिल्लीला पाठवले तर राज्यातील पक्षसंघटनेत अधिकार अजित पवारांना दिले. तरीही काका-पुतण्यामध्ये मात्र काही गोष्टींमुळे मतभेद होत राहिल्याचा बातम्या समोर येत होत्या.
विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांकडे मदत मागितली तेव्हा त्यांना सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रिपद 5 वर्षांसाठी देण्याचं ठरलं. पण राष्ट्रवादीने नंतरच्या काळात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी समोर आली.
महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांना एका उद्योगपतीने सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं आहे. परंतु या बद्दल आपल्याला यातलं काहीच सांगण्यात आलं नाही कारण शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमनातरी करायचे आहे, असा समज अजित पवार यांनी करून घेतला. आणि याच शंकेपायी, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.