ऐन निवडणूक काळात काँग्रेस- राष्ट्रवादी सोडून भाजप- शिवसेनेत प्रवेश केलेल्या 'या' 9 उमेदवारांचा झाला पराभव
चला तर बघूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेना आणि भाजपात प्रवेश करून पराभव ठरलेल्या काही दिग्गजांची यादी.
यंदाची विधानसभेची निवडणूक राजकीय वर्तुळात खूपच विशेष ठरली. कारण भाजपची केंद्रातील ताकद बघून अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेना महायुतीत प्रवेश केला. एक्सिट पोलने देखील महायुतीचीच साथ दिली होती परंतु अंतिम निकाल मात्र महायुती तितकासा दिलासा न देणारा ठरला.
चला तर बघूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेना आणि भाजपात प्रवेश करून पराभव ठरलेल्या काही दिग्गजांची यादी.
उदयनराजे भोसले
या यादित सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे उदयनराजे भोसले. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून मिळालेल्या खासदार पदाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. परंतु जनतेला मात्र त्यांचा निर्णय अजिबात पातळ नाही आणि जनतेचा हाच रोष दिसून आला निकालातून. जनतेने राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना बिजाई करून उदयनराजेंना मात्र पराभवाची वाट दाखवली.
हर्षवर्धन पाटील
इंदापूरमधील भाजपकडून निवडणूक लढवणारे हर्षवर्धन पाटील हे आधी कॉंग्रेस पक्षात होते. पण त्यांनी पक्षबदल केल्याने जनतेने इथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय मामा भरणे यांनाच विजयी केले.
जयदत्त क्षीरसागर
ऐन निवडणुकीच्या काळात, बीडमधील जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र याही लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसनेच विजय संपादन केला. जयदत्त यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी इथे बाजी मारली.
दिलीप सोपल
निवडणुकी आधी दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. परंतु बार्शी मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र राउत हे विजयी झाले तर दिलीप यांची हार झाली.
रश्मी बागल
करमाळा मतदारसंघातून रश्मी बागल यांनी देखील राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठींबा दिला होता. अखेर रश्मी बागल यांचा पराभव झाला आहे.
दिलीप माने
सोलापूरात कॉंग्रेस सोडून दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथे प्रणिती शिंदे यांचा विजय झालेला आहे तर दिलीप माने यांना हार पत्करावी लागली.
पांडुरंग बरोरा
राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले पांडुरंग बरोरा हे तब्बल 15 हजाराहून जास्त मतांनी पराभूत झाले आहेत. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा हे विजयी ठरले आहेत.
वैभव पिचड
वैभव हे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. मात्र त्यांचा देखील राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे यांच्यासमोर पराभव झाला आहे.
Pankaja Munde यांच्या पराभवाची कारणे नेमकी काय... वाचा सविस्तर
भाऊसाहेब कांबळे
श्रीरामपूर येथे भाऊसाहेब कांबळे हे आधी कॉंग्रेसचा आमदार होते. मात्र या वेळेस शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. त्यांचा कॉंग्रेसच्या नाथा कानडे या उमेदवाराने पराभव केला आहे.