Helmet Mendatorty In Navi Mumbai: दुचाकी अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नवी मुंबईत आता हेल्मेट वापरणे सक्तीचे

अपघाताच्या वेळी हेल्मेट न घातल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

Helmet

वाढत्या दुचाकी वाहनांच्या अपघातांना कमी करण्यासाठी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यलय आणि खासगी - सरकारी कार्यालयांना कठोर पावले उचलण्यासाठी नोटीस ही बाजवली आहे. मोटार वाहन कायदा 194 (सी) नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोसटीसमध्ये हेल्मेट घालण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. नवी मुंबईत  विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यलय आणि खासगी - सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्तीच्या नियमाबाबत जनजागृती माहिम राबवण्यात येत आहे.

राज्यातील वाहन अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे दुचाकींशी संबंधित असतात. अपघाताच्या वेळी हेल्मेट न घातल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. हे अपघातातील मृत्यृचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णया हा  नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे.

नवी मुंबईच्या उपप्रादेशीक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी या बद्दलची माहिती दिली. तसेच विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यलय आणि खासगी - सरकारी कार्यालयांना या संदर्भातल्या नोटीस पाठवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच दुचाकीस्वारांना त्यांच्या आवारात हेल्मेटशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. जर कोणती संस्था हे पालन करण्यास अयशस्वी झाली तर संस्थेला जबाबदार धरून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आसा आहे.