Maharashtra Rain Update: शुक्रवारपासून राज्यातील किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज
प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे.
शुक्रवारपासून किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात मंगळवारी पावसाने उघडीप दिली.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, त्याचे वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रुपांतर झाले आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात आणखी दोन पावसाचा जोर राहणार आहे. राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने बुधवारसाठी रायगड, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे. (हेही वाचा - Kokan Weather Forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे?जाणून घ्या हवामान अंदाज!)
राज्यात नाशिक, पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. शुक्रवारपासून किनारपट्टीवरही पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत ताम्हिनी येथे 270 मिमी, पालघर येथील तलसरी येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान कोकणात आज अती मुसळधार पावसास इशारा देण्यात आला आहे. व सोबतच हवामान खात्याने आज कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार मध्यरात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूरमधील काजळी नदी, चिपळूणमधील वाशिष्टी नदी, खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे