Chiplun Flood: चिपळूण जलमय, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप; घरे, वाहने पाण्यात, नागरिक छतांवर; एनडीआरएफ पथकाद्वारे मदतकार्य सुरु

चिपळून शहरात पूराचे (Chiplun Flood) पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत.

Chiplun Flood | (Photo Credit: Twitter)

कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरी (Heavy Rains in Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) शहराला बसला आहे. चिपळून शहरात पूराचे (Chiplun Flood) पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत. वाहनं, दुकानं, रस्ते पाण्याखाली आहेत. विद्युतपूरवठाही खंडीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मोबाईलची बॅटरीही संपली आहे. अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर्सना रेंज नाही. त्यामुळे नागरिकांशी संपर्क होणेही कठीण होऊन बसले आहे. असा स्थितीत राज्य सरकारने प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे एक पथकही चिपळूणला रवाना झाले आहे.

एनडीआरएफचे एक पथक चिपळूनमध्ये दाखल झाले आहे. या पथकात 45 जवान तैनात आहेत. पाच स्पीड बोटींच्या सहाय्याने हे जावान मदत पोहोचवत आहेत. काही ठिकाणी एनडीआरएफचे जावन मदत कार्यासाठी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे स्थानिक तरुणांनीच पुढाकार घेत मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाहच इतका तीव्र आहे की, स्थानिक प्रशासनाच्या बोटीही परत येत असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पूरपरिस्थिती, NDRF ने पाठवली नऊ पथके)

चिपळून शहरात आतापर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. अचानकच इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने प्रशासनही गोंधळून गेले. अनेक स्थानिक नागरिकांनी सांगितले की, चिपळून शहरामध्ये पाठीमागील अनेक वर्षांमध्ये एकदाही अशी स्थिती निर्माण झाली नाही. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या परमाणावर पाऊस पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही म्हटले आहे की, मुख्यमंत्री स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. प्रशासन शक्य तितक्या प्रमाणात सर्वतोपरी प्रयत्न करुन मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. आवश्यक ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारा मदत पोहोचविण्यासाठी ही मदत मागण्यात आली आहे. आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. अनेक ठिकाणी मदत पोहोचविण्यास मर्यादा येत आहेत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif