
Maharashtra Weather Update: राज्यात सध्या नैऋत्य मान्सून बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी नारिंगी (Orange Alert) आणि यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. या जिल्ह्यांसाठी नारिंगी रंगाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तथापी, मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईतील उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता -
दरम्यान, मुंबईतील दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, अंधेरी आणि मालाड भागात सकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील हवामान ढगाळ राहणार असून आर्द्रता आणि उष्णता जाणवणार आहे. पालघर जिल्ह्यात किनारी भागात वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी आणि बोटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा -Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज)
नवी मुंबईत पावसाचा इशारा -
तथापी, नवी मुंबईत आकाश ढगाळ राहणार असून दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळे होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कमाल तापमान 29-30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 27-28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Nashik Rains: नाशिक मध्ये गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात वाढ; अनेक मंदिरं पाण्याखाली)
कोकण किनारपट्टीवरील भागात मुसळधार पाऊस -
याशिवाय, रत्नागिरी, महाड, चिपळूण, खेड, देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तथापी, हवामान खात्याने आज या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.