पुण्यात पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता

हा कदाचित परतीचा पाऊस असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

Rainfall | (Image used for representational purpose only) | (Photo Credits: pixabay)

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर हा ब-यापैकी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे नवरात्री उत्सवामध्ये पावसामुळे गरबा खेळण्यासाठी बाहेर पडणा-यांच्या आनंदावर विरजण पडेल अशी भीती वाटत होती. मात्र पाऊस थांबल्यामुळे गरबा प्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. तर दुसरीकडे पुणे (Pune) वेधशाळेकडून पुढील 5 दिवस पुण्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा कदाचित परतीचा पाऊस असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

सप्टेंबरच्यपणी नद्यांना पूर आला होता तर काही ठिकाणी नद्यांचे पाणी काही वस्त्यांत शिरले. या सर्वांवर मात करत पुणेकरांना मार्ग काढला खरा मात्र आता पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेल्या अंदाजामुळे पुन्हा एकदा पावसाचे सावट पुणेकरांवर आले आहे. सध्या पुणे शहरातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून ते नंतर कमी होत जाईल असेही वेधशाळेने सांगितले आहे. हेही वाचा- पुणे: डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या प्रवाशाने ऑम्लेट मध्ये अळ्या सापडल्याच्या तक्रारीची IRCTC कडून दखल; केटररला ठोठावला 25,000 रूपयांचा दंड

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरही एक- दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, 4 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

5 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. 6 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.