Heavy Rain With Thunderstorm In Kolhapur: कोल्हापूरात मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पाऊस, नागरिकांची तारंबळ

सखल भागात असललेल्या घरांमध्येही पावासाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली. दरम्यान, सांगली (Sangli) जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळाला.

Heavy Rain | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेले पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आज सायंकाळी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दमदार पासाने हजेरी लावली. यात कोल्हापूर शहर (Kolhapur City) आणि पन्हाळ्यात काहीसा अधिकच पाऊस कोसळला. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली.

दिवसभर उन्हाचा कडाका कायम असताना सायंकाळच्या वेळी अल्पावधीतच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सखल भागात असललेल्या घरांमध्येही पावासाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली. दरम्यान, सांगली (Sangli) जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळाला.

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने काही काळ उघडीप दिली होती. मात्र, उन-पावसाचा खेळ सुरु होता. गेल्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. परंतू, पाठिमागच्या दोन तीन दिवसांच्या तुलनेत पावसाने आज अचानक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह जिल्हातील इतर तलाव, ओढे, नाले दुथडी भरुन वाहात आहेत. (हेही वाचा, Maharashtra Rains: राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस; वीज कोसळल्याचीही घटना, अहमदनगर जिल्ह्यात गाय, बैल ठार)

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. सांगली शहर तसेच मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे.