Heavy Rain In Thane: ठाणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; अवघ्या तासाभरात 40 मिमी पावसाची नोंद, कळवा, मुंब्रा परिसरात पाणीच पाणी

त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात तर पाऊस आज (09 सप्टेंबर) इतका बेफाम पडला की त्याची ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी अशी दखल घेण्यात आली. अवघ्या तासाभरात ठाणे जिल्ह्यात जवळपा 40 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पावसाने महाराष्ट्रभर दमदार पुनरागमन (Heavy Rain In Thane) केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात तर पाऊस आज (09 सप्टेंबर) इतका बेफाम पडला की त्याची ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी अशी दखल घेण्यात आली. अवघ्या तासाभरात ठाणे जिल्ह्यात जवळपा 40 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे ठाणे, कळवा (Kalwa) आणि मुंब्रा (Mumbra) स्टेशन आणि रेल्वे मार्गांवर पाणीच पाणी झाले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनीटे विलंबाने धावू लागली. ठाण्यासोबतच मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचले.

दौलत नगर परिसरात 85 मिमी पावसाची नोंद

ठाणे शहरातही मुसळधार पावसाची नोंद झाली. एकट्या दौलत नगर परिसरात जवळपास एक तासात 85 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय कळवा, मुंब्रा परिसरातही जोरदार पाऊस झाला. ठाणे शहरात गावदेवी परिसर, वागळे इस्टेट या ठिकाणीही पावसाने जोरदार बॅटींग केली. (हेही वाचा, Heavy Rain in Maharashtra: महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट')

मुंबई, नवी मुंबईत कोसळधार

ठाण्याप्रमाणेच मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई उपनगर असलेल्या भांडूप परिसरात एक तासात तब्बल 71 मिली मीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबईमध्ये ऐरोली गावा एक तासात 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचू शकते. उद्या अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता अनंत चतुर्दशीला दरवर्शीच पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे यंदाही पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर गणपती विसर्जनात काहीसा अडथळा येऊ शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसात पढणाऱ्या मुसळधार पावसाची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी, नाशिक (Nashik) या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय कोकण (Kokan), पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.