Weather Forecast Mumbai: मुंबईत दमदार पाऊस, पुढचे 4-5 तास महत्त्वाचे; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात साचले पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज
त्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. असे असले तरी आयएमडीने (IMD) हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, शहरात पुढच्या काही तासांमध्ये केव्हाही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होऊ शकतो.
संततधार पाऊस (Mumbai Rain) कोसळत असलेल्या मुंबई शहरासाठी आज (18 जुलै) पुढचे तीन ते चार तास अधिक महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर आणि पहाटेनेंतर सकाळीसुद्धा मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. असे असले तरी आयएमडीने (IMD) हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, शहरात पुढच्या काही तासांमध्ये केव्हाही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होऊ शकतो. त्यामुळे या शहरासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहराचे तापमान
मुंबई शहराचे आजचे तापमान सरासरी किमान 25 सेल्सिअस ते कमाल 29 सेल्सिअस इतके राहणार आहे. शहरात सुरु असलेली संततधार पावसाची उपस्थितीही कायम राहणार असल्याचा हवामान अंदाज आयएमडीने आहे. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबई परिसरात 51.8 मिमी तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सातत्याने कोसळतच राहिल्याने शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचू लागले आहे. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबई मध्ये रात्रभर संततधार; सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली)
रेल्वे वाहतूक उशिरा
संतधार कोसळणारा मुंबईचा पाऊस सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम करतो आहे. रेल्वे वाहतूक संथ गतिने धावत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या मध्य, हार्बर, आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सरासरी 10 ते 15 मिनीटांनी उशीरा धावत आहेत. परिणामी रेल्वे स्टेशन फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळची वेळ असल्याने लोकल रेल्वे वाहतुकीस नेहमीच गर्दी असते. त्यात आज लोकल उशीरा धावत असल्याने या गर्दीत वाढ झाली आहे. दरम्यान, ठाणे, कल्याण, डोंबीवली, टीटवाळा या ठिकाणीही पाऊस पडत असल्याने मध्य रेल्वे वाहतूक आणखीच धिम्या गतीने सुरु आहे. (हेही वाचा, Weather Forecast For India: महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा हवामान अंदाज, घ्या जाणून)
अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
दरम्यान, केवळ मुंबईच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. परिणामी या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरांमध्ये मुसळधार पावसाने काहीसी नागरिकांची गैरसोय होत असली तरी, राज्यात बळीराजा मात्र सुखावल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच, काही ठिकाणी शेतकरी पावसाने उघडीप दिली की, राणाला वापसा येईल त्यानंतर शेतीच्या कामांना हात घालण्याचा विचार करत आहेत.