Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद

आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यासह पुण्यात देखील पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rainfall (PC- ANI)

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्खळीत झालेले पहायला मिळत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या (Mumbai Rain) सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुर या परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. (हेही वाचा - Landslide-Prone Area: इरशाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकार ॲक्शन मोड’वर; राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय, घ्या जाणून)

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पूर्णपणे पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्यामुळं इथं पाणी भरलं आहे. त्यामुळं वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आणि पालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.

आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यासह पुण्यात देखील पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now