Rain in Ratnagiri District: रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस; दापोली, चिपळूण शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा
त्यामुळे दापोली (Dapoli), चिपळून (Chiplun) आदी ठिकाणांवरील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. प्रामुख्याने दापोली येथील बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय आदी ठिकाणांवर रात्री बरेच पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Rain in Ratnagiri District) कोसळतो आहे. त्यामुळे दापोली (Dapoli), चिपळून (Chiplun) आदी ठिकाणांवरील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. प्रामुख्याने दापोली येथील बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय आदी ठिकाणांवर रात्री बरेच पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक नागरिक सांगतात की इतिहासात पहिल्यांदाच दापोलीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.चिपळूणमध्येही पाठिमागील 16 मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामळे पाठिमागच्या पावसात घाबरलेल्या चिपळूणकरांनी या पावसात अख्खी रात्र जागून काढली.
चिपळूण शहरातील वशिष्ट आणि शिवनदी काटाला लागून घरे असलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचे अवाहन करण्यात आले आहे. पाठिमागील पावसाचा अनुभव लक्षात घेता या वेळी नागरिकांनी सामानाची हालवाहालव केली. संततधार कोसळत असलेला पाऊस जर असाच कायम राहिला तर समुद्र भरती वेळी पावसाचे पाणी शहरात घुसू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन चिपळून नगरपालिका आपत्ती व्यवस्थापण समिती व मदतकार्य विभागाने पूर्वनियोजन केले आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यभर कोसळणार मुसळधार सरी; IMD चा अंदाज)
प्रशासनाकडून चिपळून शहरातील सखल आणि नदीकाटच्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरवासियांमध्ये भीतीची भावना आहे की, पाठिमागील पावसाप्रमाणे याही पावसात पाणू साचेल की काय? त्यामुळे नागरिक आतापासून काळजी घेताना दिसत आहेत. दरम्यान, प्रशासनाने म्हटले आहे की वशीष्ट नदीत पाणी पातळी काहीशी वाढली असली तरी नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नाही. परंतू पाऊस जर असाच संततधार बरसत राहिला तर मात्र पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर येऊ शकते.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी संततधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबई, पालघरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा कडकडाट पाहायला मिळू शकतो.